अशोक सावंत हत्येप्रकरणी पाचवा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0

मुंबईचे शिवसेना माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाचव्या आरोपीला अटक केली आहे. अनिल वाघमारे असे आरोपीचे नाव असून समता नगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

रिक्षाचालक गणेश जोगदंड, कॉन्ट्रॅक्ट किलर सोहेल दोडीया आणि एका अल्पवयीन मुलाला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तसेच विशाल गायकवाड या ३३ वर्षीय तरुणाला कल्याणमधून अटक केली होती.

अशोक सावंत यांच्या हत्येचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाहीये. तीन वर्षांपूर्वी एका व्यक्तीने अशोक सावंत यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती. पोलीस त्या तक्रारदाराचा शोध घेत आहेत. गुरुवारी (११ जानेवारी) तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील दोघांना अटक केली आहे.

कांदिवली समतानगरचे माजी नगरसेवक अशोक सावंत रविवारी (७ जानेवारी) रात्री घरी परतत होते. अज्ञात व्यक्तींनी चॉपरने वार करुन निघृण हत्या केली. त्यांना उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांना मृत घोषीत करण्यात आले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.