अल्पवयीन मुलाची गळा दाबून हत्या, १५ वर्षीय मित्राला अटक

0

गोंदियाच्या देवरी तालुक्यात खेळत असताना झालेल्या वादात १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने २ वर्षांच्या अल्पवयीन मित्राची हत्या केली. ही धक्कादायक घटना चिचगड येथे घडली आहे. पुष्कर निर्मल परिहार (१२) असे नाव मृतकाचे नाव आहे.

चिचगड येथील गुलाबाबा मंदिरात प्रवचनाचा कार्यक्रम सुरु होता. प्रवचनाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी चिचेवाडा येथील पुष्कर परिहार हा आपल्या आजीसह आला होता. तेव्हा मंदिराबाहेर मुले खेळत होती. दरम्यान, पुष्कर त्या मुलांसोबत खेळायला गेला असता त्यांच्यात १५ वर्षिय मुलगाही त्याच्यात खेळात होता त्याच्यासोबत पुष्करचे भांडण झाले.  त्यात १५ वर्षीय  मित्रानेंच पुष्करचा गळा आवळला. त्यांनतर काही वेळातच पुष्कर बेशुद्ध पडला. पुष्करला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चिचगड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.