अभिनेत्री सायरा बानो यांची नरेंद्र मोदींकडे मदतीची याचना, टि्वट करून मागितली भेटण्याची वेळ

0

जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या टि्वटर अकाऊंटवरून दिलीप कुमार यांची पत्नी आणि जेष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदतीसाठी साकडे घातले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनांचा कंटाळा आला असून आता तुम्हीच यात लक्ष घाला, असेही सायरा बानो यांनी टि्वटमध्ये लिहिले आहे.

भूमाफिया समीर भोजवानी यांच्यापासून दिलीप कुमार यांचा बंगला वाचवण्यासाठी त्यांनी मोदींकडे मदत मागितली आहे. नरेंद्र मोद आपली शेवटची आशा आहेत, असेही त्या म्हणतात.

मागील दोन दिवसांपूर्वीच समीर भोजवानीची तक्रार सायपा बानो यांनी मोदींकडे केली होती. भूमाफिया समीर भोजवानी तुरुंगातून सुटला असून त्याने दिलीप कुमार यांची बंगल्याच्या जागेवर दावा केला आहे. मात्र अद्याप देवेंद्र फडणवीसांकडून कोणतीच कारवाई झाली नाही. समीर भोजवानी दिलीप कुमार यांना धमक्या देत आहे. तो आपल्या बळाचा वापर करत असल्याची तक्रारही त्यांनी केली होती.

https://twitter.com/TheDilipKumar/status/1075075521220767744

सायरा बानो यांचे टि्वट…
‘सायरा बानो यांच्याकडून विनंती… आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मी तुमच्या भेटी वेळ मागत असून मी तुमची मिळण्याची वाट पाहत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासनांचा कंटाळा आला आहे. भूमाफिया समीर भोजवानीपासून दिलीप कुमार यांचे घर वाचवण्यासाठी तुम्हीच एकमेव आशा आहात. कृपया मी तुमच्याकडे मदत मागते.’

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.