अभिनेत्री पूजा डडवाल टीबीने त्रस्त, सलमानकडे मागितली आर्थिक मदत

0

अभिनेता सलमान खानसोबत ‘वीरगती’ चित्रपटात झळकलेली अभिनेत्री पूजा डडवाल सध्या टीबीच्या आजाराशीने त्रस्त आहे. आर्थिक मदतीसाठी तिने सलमान खानला संपर्क केला मात्र त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

पूजा सध्या टीबी आजाराला लढा देत आहे. पूजाची आर्थिक स्थिती वाईट झाल्याने तिच्याकडे उपचारासाठीही पैसे नाहीये. ती मागील १५ दिवसांपासून मुंबईतील शिवडी येथील रुग्णालयात दाखल आहे. ६ महिन्यांपूर्वी पूजाला टीबी झाल्याचे समोर आले.

या आजारापणात पूजाला तिचा नवरा आणि कुटुंबियांनी वाऱ्यावर सोडले. उपचार मिळत नसल्याने तिची प्रकृती बिघडत चालली आहे. त्यामुळे आर्थिक मदतीसाठी तिने सलमानलाही संपर्क केला मात्र त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पूजाने स्वतःचा एक व्हिडिओ तयार केला आहे, कदाचित तो पाहून तरी सलमान तिला संपर्क करेल, अशी तिला अपेक्षा वाटते.

पूजाने ‘हिंदुस्तान’, ‘इंतकाम’, ‘सिंदूर की सौगंध’ या चित्रपटात काम केले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.