अनेकांना लागले वेध विधानसभेचे

पश्चिममध्ये भाजपकडून लढण्यासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

0
  • औरंगाबाद : (अभय निकाळजे, वरिष्ट पत्रकार )

राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. पण 2019 च्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. म्हणुन दोन्ही पक्षात ‘गुडघ्या बाशिंग बांधून’ अनेक जणांनी आत्तापासुनच प्रचार सुरू केला आहे. पश्चिम विधानसभा मतदारसंघात विद्यमान शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना ‘कडवी’ लढत कोण देऊ शकतो, यापेक्षा पक्ष कोणाच्या पारड्या उमेदवारी टाकतो, हे महत्वाचे आहे.

शिवसेनेची एकच आमदारकी अशी आहे, की ज्याचा विजय निश्चित आहे, ती म्हणजे औरंगाबाद (संभाजीनगर) पश्चिम विधानसभा आहे. संजय शिरसाट यांच्यासमोर ‘तगडे राजकीय’ आव्हान देणाऱ्या उमेदवाराची चाचपणी सध्या सुरू आहे. त्यामध्ये फक्त भाजपच आहे, असे नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही चाचपणी सूरू आहे.

पण ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपमध्ये 2019 च्या निवडणुकीबाबतचा आत्मविश्वास अधिक आहे. म्हणुन उमेदवारी मिळविण्यासाठी जास्त चढाओढ आहे. पण औरंगाबाद (संभाजीनगर) पश्चिम विधान सभा मतदार संघातून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी धनुष्यबाण, अशोकचक्राची साथ सोडून कमळाबाईच्या दरबारात हजेरी लावली. पण या दरबाऱ्यांनी ज्यांच्या हाताच्या बोटाला धरून कमळ हाती धरले. त्यांची मोठी अडचण आहे, ती अशी की मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात एकही कार्यकर्ता नाही, त्या नेत्याच्या हातात काहीच नाही. मुख्यमंत्रीच सगळ्या उमेदवाऱ्या निश्चित करतील, असे विश्वासनीय भाजपा सुत्र सांगतात.

त्यामुळे ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांची मोठी अडचण होणार आहे. पण भाजपमध्ये सुरवातीपासून असणाऱ्या राजू शिंदेंना उमेदवारी मिळाली तर आमदार शिरसाट यांना कडवी झूंझ पहायला मिळेल.पण शिंदेऐवजी दूसऱ्या कुणालाही उमेदवारी दिली, तर लढत एकतर्फी होण्याचीच जास्त शक्यता आहे. भाजप शिरसाटांच्या समोर एसी कॅटेगिरीतील दूसऱ्या जातीच्या उमेदवारीला प्राधान्य दिले तर मग या विधान सभा मतदार संघातील निकाल अनपेक्षित लागू शकतो.</p>

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.