अनुष्काच्या ‘परी’चा टीझर रिलीज
बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतेच क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केले आहे. लग्न केल्यानंतर ती आफ्रिका दौऱ्यावर गेली. त्यानंतर ती आता चित्रपटांकडे लक्ष केंद्रित करत आहे. अनुष्काने तिच्या ‘परी’ या चित्रपटाचा टीझरही रिलीज केला आहे.
अनुष्काने ट्विटर अकाऊंटवर ‘परी’ चित्रपटाच्या रिलीज डेटबरोबरच टीझरही रिलीज केला आहे. ही पोस्ट शेयर करताना अनुष्काने स्वीट ड्रीम्स, असे लिहिले. टीजरमध्ये अनुष्काचा लुक अतिशय भयभीत करणारा आहे. तिचा हा लुक पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. हा टीझर पाहिल्यानंतर चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा आहे.
हा सिनेमा ९ फेब्रुवारीला रिलीज होणार होता. मात्र, आता ही रिलीज डेट बदलली असून २ मार्चला प्रदर्शित होणार आहे.