अण्णा हजारे पोहोचले रामलीला मैदानावर

0

सहा वर्षांनंतर अण्णा हजारे पुन्हा एकदा दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. विविध मागण्यांसाठी ते केंद्र सरकारला लक्ष करणार आहेत. अंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी अण्णांनी शुक्रवार सकाळी राजघाट येथील महात्मा गांधींच्या समाधीला तसेच शहिदांच्या स्मारकाला श्रध्दांजली अर्पण केली. अण्णा हजारे रामलीला मैदानवर पोहोचले आहेत.

अंदोलनाला लाखो लोक येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे.

शेतक-यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अंदोलन करणार असल्याचे अण्णांनी सांगितले. तसेच जनलोकपाल, निवडणूक सुधारणा अशा अनेक जुन्या मागण्या अण्णा अंदोलनातून करणार आहेत. 2011 साली अण्णांनी याच रामलीला मैदानावर अमर उपोषणाला बसले होते. या अंदोलनाला त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला होता.

आमच्या अंदोलनाला लोकांनी येऊ नये यासाठी सरकारने रेल्वे आणि बसेस रद्द केल्या. सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप अण्णांनी केला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.