अण्णा हजारेंच्या उपोषणाचा सहावा दिवस

0

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर अण्णा विविध मागण्यांसाठी उपषोण करत आहेत. मात्र अद्याप अण्णांच्या मागण्यांवर सरकार काहीच निर्णय घेत नसल्याने हे उपोषण सुरुच आहे.

मंगळवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांसोबत चर्चा केली. परंतु यातून काही सकारात्मक बाब पुढे आली नसल्याने अण्णांनी उपोषण सुरुच ठेवले आहे. अण्णांनी उपोषण मागे घ्यावी यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना केंद्र सराकरसह राज्य सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे.

गिरीश महाजन यांनी सरकारचा प्रस्ताव अण्णांपुढे मांडला आहे. परंतु अण्णांनी यात अनेक त्रुटी निदर्शनास आणुन दिल्या. यात मुख्य मुद्दा शेतक-यांचे प्रश्न आणि लोकपालचा होता. मात्र तांत्रिक अडचणींमुळे अण्णांच्या मागण्या जशाच्या-तशा मान्य करण्यास अनेक अडचणी असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, अण्णांच्या उपोषणाचा सहावा दिवस असुन त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.