अण्णा आज सोडू शकतात उपोषण, मुख्यमंत्री दिल्लीला रवाना

0

अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. विविध मागण्यांसाठी अण्णा दिल्ली येथील रामलीला मैदानावर उपोषणासाठी बसले आहेत. अण्णांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली असुन डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दिल्लीकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री आणि महाजन अण्णांटची भेट घेऊन सकारात्मक चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यामुळ आज अण्णांचे उपोषण सुटु शकते असेही चित्र दिसत आहे.

उपोषणाचा सातवा दिवस उजाडला असूनही सरकारने अण्णांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. मात्र गिरीश महाजन यांनी वारंवार अण्णांची भेट घेऊन त्यांची मनधारणी केली होती. परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार अण्णांनी घेतला आहे.

उपोषणामुळे अण्णांचे वजन 5 किलोने कमी झाले आहे. त्यामुळे त्यांनी आज उपोषण सोडण्याची गरज आहे, तसे झाले नाही तर त्यांची प्रकृती आणखी बिघडू शकते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

या आहेत अण्णांच्या मागण्या –
* कृषीमुल्य आयोगाला स्वायत्त दर्जा द्यावा, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या 50 टक्के जास्त दर द्यावा.

* स्वाभिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.

* लोकायुक्त आणि लोकपालाची त्वरित नियुक्ती करावी.

* शेतीच्या औजारांवर जीएसटी नसावा.

* शेतमजुरांना उत्पादन सुरक्षा आणि रोजगाराची हमी द्या.

* शेतीवर अवलंबून असणा-या शेतक-यांना दरमहा 5 हजार रुपये पेशन्स द्यावे.

* नुकसानीचे पंचनामे वैयक्तिक असावे, शेतक-यांच्या पिकाचा वैयक्तिक विमा काढावा.

* शेतक-यांच्या कर्जावर चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारू नये.

* राईट टू रिकॉल

* राईट टू रिजेक्ट 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.