अजय देवगण लढणार भ्रष्टाचार विरोधात, ‘रेड’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

0

गोलमाल चित्रपटातून धूम घातल्यानंतर अभिनेता अजय देवगण आता नवीन आणि गंभीर भूमिकेत दिसणार आहे. अजयच्या ‘रेड’ या आगामी चित्रपटाचा एक ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ‘नो वन किल जेसिका’ आणि ‘आमीर’सारखे चित्रपट तयार करणाऱ्या दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांचा हा चित्रपट आहे.

हा चित्रपट 1981 मध्ये उत्तर प्रदेशच्या लखनऊ शहरात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटात अजय देवगण इनकम टॅक्स ऑफिसरची भूमिका साकारत आहे. अजय भ्रष्टाचारच्या विरोधात लढताना दिसणार आहे.

तसेच यात इलियाना डिक्रूज आणि अजयचा रोमान्ससुद्धा बघण्याची संधी आहे. चित्रपटात इलियानाने अजयच्या पत्नीची भूमिका केली आहे. चित्रपटात सौरभ शुक्ला आणि अमित सयाल यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. 16 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

खाली क्लिक करून बघा चित्रपटाचा ट्रेलर…

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.