अजय देवगण झळकणार मराठीत, ‘आपला माणूस’मधून करणार पदार्पण
बॉलिवूडमध्ये 25 वर्षे घालवल्यानंतर अभिनेता अजय देवगण आता मराठीत दिसणार आहे. अनेक दिवसांची इच्छा पूर्ण होत असल्याचे अजयने एका व्हिडिओतून सांगितले. सिनेमाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे करणार असून ‘आपला माणूस’ असे चित्रपटाचे नाव आहे. 9 फेब्रुवारी 2018 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अजयने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून ही बातमी चाहत्यांना दिली आहे. ‘महाराष्ट्रासोबत माझे नाते जन्मापासून आहे. मराठी भाषेसाठी मनात पहिल्यापासूनच आदर आहे. पण काजलसोबत लग्न केल्यानंतर महाराष्ट्राची भाषा, संस्कृतीच्या आणखी जवळ आलो. या भाषेवर प्रेम जडले. या संस्कृतीमुळेच मराठी चित्रपटांची आज एक वेगळी ओळख आहे. या संस्कृतीसोबत जोडण्यासाठी मी घेऊन येतोय माझा पहिला मराठी चित्रपट ‘आपला माणूस’ असे अजय देवगणने व्हिडिओत म्हटले आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, सुमीत राघवन, इरावती हर्षे अशी स्टारकास्ट दिसणार आहे.