अंड्याच्या अतिसेवनाने आरोग्यावर होतील हे परिणाम

0

अंड हे आरोग्यदायी आहे. अंड्यात व्हिटॅमिन, कॅल्शियम, आयर्नसारखे अनेक घटक असतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याला तसेच झटपट चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी अंड्याचा वापर केला जातो. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, वजन कमी असलेल्या लोकांना वजन वाढवण्यासाठी अंडे फायदेशीर असतात. परंतु कोणत्याही गोष्टीचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात. त्यामुळे आहारात अंड्याचा अतिप्रमाणात समावेश झाल्यास काय होते? हे आज जाणून घेऊया..

* एका अंड्यात १८५ मीग्रॅ कोलेस्ट्रेरॉल असते. एका दिवसात ३०० मीग्रॅ कोलेस्टेरॉलचा समावेश करणे योग्य आहे.

* ३-४ अंडे खाल्याने कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका जास्त असतो. उन्हाळ्यात याचे प्रमाण कमी करावे.

* एका दिवसात किती अंडे खावे?
एका दिवसात दोन अंडे खाणे फायदेशीर आहे, परंतू त्यापेक्षा अधिक अंडे खाणे आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.

* एकावेळी अनेक अंडे खाल्यास काय होते?
अंड्यामुळे शरीरात उष्णता वाढते म्हणजे त्यामुळे अस्वस्थता व पचनाचा त्रास वाढतो.

* अंड्याचे सेवन कसे करावे?
अंडे उकडलेले हे दुसऱ्या कोणत्याही पदार्थापेक्षा जास्त फायदेशीर आहे. अंड्याच्या फ्राईड पदार्थांत तेलाचा अतिवापर आरोग्याला हानीकारक असतो.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.