अंडर 19 विश्वचषकासाठी भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना

0

अंडर 19 विश्वचषकासाठी भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला आहे. या विश्वचषकासाठी भारताच्या कर्णधारपदी मुंबईचा पृथ्वी शॉची निवड करण्यात आली आहे. पृथ्वी शॉ आणि विराट कोहलीची टीम इंडिया दोन्ही संघ पहाटे 4 वाजता मुंबई विमानतळावरुन दुबईकडे रवाना झाले आहे. दुबईवरुन विराट कोहलीची टीम दक्षिण आफ्रिकेसाठी तर पृथ्वी शॉची टीम न्यूझीलंडसाठी रवाना झाली. अंडर 19 संघाची बांधणी राहुल द्रविडने केली असून या संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी राहुल द्रविडच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

पुढील वर्षी म्हणजे येत्या 13 जानेवारीपासून अंडर 19 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. 14 जानेवारीला भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पहिला सामना रंगणार आहे. भारतीय अंडर 19च्या टीमकडून पृथ्वी शॉ (कर्णधार), हिमांशू राणा, शुभमन गिल, अभिषेक शर्मा, मनज्योत कार्ला, रियान पराग, कमलेश नागरकोटी, हार्विक देसाई, शिवम मावी, अनुकुल सुधाकर रॉय, इशान पोरेल, शिवा सिंग, पंकज यादव, आर्यन जुयल, अर्शदीप सिंग हे खेळणार आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.