अंडर-19 वर्ल्डकप : भारताने चौथ्यांदा पटकावला वर्ल्डकप, रचला नवा विक्रम

0

अंडर 19 क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने चौथ्यांदा वर्ल्डकप मिळवून नवा विक्रम रचला आहे.

भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर जम बसवला होता. ऑस्ट्रेलियाच्या पटापट विकेट पाडून सामना आपल्या बाजूने केला. ऑस्ट्रेलियन टीम 216 रनवर ऑलआऊट झाली.

अंडर 19 विश्वचषकाचा हा अंतिम सामना न्यूझीलंडमधल्या माऊंट मॉन्गानुईच्या मैदानात झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला होता. 131 रन्सवर भारताला दुसरा धक्का बसला. शुभमान गिल 31 धावांवर बाद झाला. त्याआधी 71 धावा झालेल्या असताना भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ 29 धावांवर बाद झाला. मात्र मनजोत कालराने उत्तम खेळी खेळून विजयाची वाटचाल सुरु केली. या वर्ल्डकपमध्ये उपकर्णधार शुभमन गिल सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.