अंडर-19 वर्ल्डकप: भारताचा दणदणीत विजय

0

अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. मंगळवारी (१६ जानेवारी) ग्रुप बी मधील दुस-या सामन्यात भारताने पापुआ न्यू गिनिया संघावर दहा विकेट घेऊन दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा पृथ्वी शॉ चा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला.

भारताच्या उत्तम खेळीसमोर पापुआ न्यू गिनियाचा संघ केवळ 64 धावात बाद झाला. डावखुरा फिरकी गोलंदाज अनुकूल रॉयने 14 धावात गिनियाचा निम्मा संघ तंबूत पाठवला. भारताने गिनियाचे 65 धावांचे आव्हान केवळ आठ षटकात पूर्ण केले.

कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनजोत कालराने अगदी आरामात विजय मिळवला. पृथ्वी शॉने 36 चेंडूत नाबाद 57 धावा काढल्या. यात 12 चौकारांचा समावेश होता. कालराने नाबाद 9 धावा केल्या. वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला होता. यानंतर भारताचां सामना जिंबाब्वेसोबत 19 जानेवारीला होणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.